MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
Rajpath Times is a complete guidance regarding MPSC / UPSC Exam. Updates about MPSC/ UPSC Latest News, Online Test, Question Papers, Syllabus, Books useful for the exam, Lectures etc.
Wednesday, June 14, 2023
ऐकावे जनावे करावे मनाचे ... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
Friday, June 9, 2023
योग्य मार्ग दाखविणारा .... तो गुरु ...
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचे ठरविले की क्लास कोणता लावायचा याची शोधाशोध सुरु होते. मात्र स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन चांगला अधिकारी होण्यासाठी फक्त क्लास नाही तर 'गुरु ' मिळणे आवश्यक आहे. जो योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला यशाचा खडतर मार्ग चालण्यासाठी मदत करेन. तसेच तुम्ही प्रामाणिक, कार्यक्षम, संवेदनशील अधिकारी घडू शकाल यासाठी तुमच्यावर तसे संस्कार करेन.स्पर्धा परीक्षेच्या बाजारात व्यावसायिक दृष्टिकोन तर आहेच ... पण हा व्यवसाय फक्त खरेदी - विक्रीचा नाही. तर आपल्या सामाजिक समस्यांवर प्रशासकीय उपाययोजना करण्यासाठी कर्तबगार अधिकारी घडविण्याचा आहे. यासाठी या व्यवसायात मूल्य असणे गरजेची आहेत. ती मूल्ये जपणारा गुरु, मार्गदर्शक, वाटाड्या ... विद्यार्थांना भेटणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थी व पालकांनी MPSC / UPSC क्लासेस न शोधता मार्गदर्शक गुरूचा शोध घ्यावा.
प्रा. मीता चौधरी
Tuesday, June 6, 2023
स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटीदहावी, बारावी, अथवा पदवीला तुम्हाला किती गुण मिळाले... तुम्ही शाळेत , कॉलेजमधील स्कॉलर विद्यार्थी होते काय?... हे मुद्दे स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जास्त महत्वाचे नाहीत. नाहीतर वर्गातील पहिल्या दहा क्रमांकाची सर्वच मुले IAS / IPS अथवा DC, तहसिलदार झाली असती. मात्र वर्गातील साधारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळविताना दिसते. कारण त्याला डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्पर्धेत तग धरता येत नाही. आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचे तर स्पर्धा परीक्षेतून संधी भरपूर असतात हे विद्यार्थ्यांना वाढत्या वयानुसार समजून येते. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य , चिकाटी, खडतर मेहनत यामध्ये जो जिंकतो ... त्यास चांगली सरकारी नोकरी नक्कीच मिळते . कितीही चढउतार , संकटे आली तरी निराश न होता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला चिकटून राहणेच ... यशापर्यत पोहोचण्यास मदत करते... 'महापुरे झाडे (वृक्षे) जाती तेथे लव्हाळे राहाती '...
Monday, May 29, 2023
अंधानुकरण करू नये...MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन...
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
MPSC -UPSC Foundation Course
Thursday, May 25, 2023
'स्वतःला ओळखा'... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
'स्वतःला ओळखा'...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व त्यातील यश ... यासाठी संयम, चिकाटी, सातत्य याची गरज असते. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. व्यक्तिमत्त्व विकसित होणे ही बाब देखील आवश्यक आहे. पदवीपर्यंत केलेल्या अभ्यासापेक्षा कैक पटीने जास्त अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वाचन, लिखाणाची बैठक जमविणे, MPSC/UPSC संदर्भ साहित्य मिळवणे, अनेक वैयक्तिक बाबींना काही काळ तिलांजली देणे, तसेच कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रापासून अलिप्त ... एकांतात राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या काळात आर्थिक गोष्टींची जुळवाजुळव ही तर अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे... या सर्वांमधून मन स्थिर ठेवून तयारी करताना अपयशाचा सामना जास्त व आशेची झुळूक तशी अल्प ... अशी स्थिती असते.
म्हणूनच ही सर्व परिस्थिती पेलण्याची क्षमता, इच्छा, जिद्द आपल्यामध्ये आहे का?... आपला निर्धार पक्का आहे का? स्पर्धा परीक्षेतील चढ उताराशी चिवट झुंज तुम्ही देऊ शकता काय? हे जाणा ... स्वतःला ओळखा ... मग स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानसागरात स्वतःला झोकून द्या ... फक्त जिकंण्यासाठीच. .. !
धन्यवाद !
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०
Monday, May 22, 2023
'Motivational Speech' चा प्रभाव
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
'Motivational Speech' चा प्रभाव
सोशल मीडियाच्या जमान्यात प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अगदी २५-३० वर्षांपूर्वी अधिकारी झालेले किंवा अलीकडे अधिकारी झालेल्या अनेकांचे motivational व्हिडीओ बघून अनेक विद्यार्थी व पालक दिवास्वप्न बघतात. आपणही त्यांच्यासारखेच IAS, IPS, Dy.Collector, तहसीलदार, PSI व्हावे या प्रभावाने स्पर्धा परीक्षेकडे वळणारे लाखो विद्यार्थी आहेत.
प्रेरणादायी व्याख्याते मिलियन व्ह्यूज मिळवितात ... पण त्यांच्याकडे असणारे गुण, क्षमता आपल्याकडे आहे का? त्यांना त्या -त्या वेळी उपलब्ध असलेली, पूरक परिस्थिती व संधी आता आहे काय? याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.
आपले स्वतःचे ज्ञान, आवड, शिक्षण, कौटुंबिक स्थिती आणि स्पर्धा परीक्षेतील बदललेली गणित... आताचे वास्तव... याचा विचार केला ... तर अनेक विद्यार्थी करिअरच्या योग्य वाटेवर जातील.
बरं ... mativational speech देणारे जी गोष्ट सांगतात ... त्यात तथ्य किती? ... मिथ्य किती ?... की स्वतःचीच टिमकी वाजवणारे आहेत... याचाही विचार व्हावा .
म्हणूनच विद्यार्थी, पालकांनी इतरांच्या यशाने प्रभावित होऊन स्पर्धा परीक्षेकडे वळण्यापेक्षा आपली क्षमता, महत्वाकांक्षा, मेहनत घेण्याची तयारी, दीर्घकाळासाठी कौटुंबिक पाठिंबा ... या सर्व बाबींचा विचार करावा.
संस्थापक व प्रमुख
Friday, May 19, 2023
* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ..
* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ... केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी कोणकोणत्या परीक्षा आहेत ? UPSC , स्टाफ सिलेक्शन कमिशन, IBPS , RRB या भरती आयोग, बोर्ड याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती मिळवा.
MPSC व राज्य शासनाच्या नोकऱ्यांसाठीच्या इतर भरती प्रकीया कोणत्या हे जाणून घ्या.
स्पर्धा परीक्षांमधून कोणकोणत्या, किती पदांसाठी संधी आहेत याची विश्वसनीय माहिती मिळवा व आपणास कोणते ध्येय साधायचे आहे ते निश्चित ठरवा. यासाठी पुढील स्रोत आहेत.
१) राजपथ अकॅडमीचा प्लॅनर, संस्कार ही दोन पुस्तके.
२) Employment News , नोकरी संदर्भ , नोकरी न्यूज
३) ओळखीच्या माहितगार व्यक्तींकडून.
४) चांगल्या स्पर्धा परीक्षा क्लासेसकडून.
५) राजपथ अकॅडमीचे Youtube Channel
Wednesday, May 17, 2023
Best Coaching Classes For MPSC Group A In Pune - Rajpath Academy
MPSC Group A 2023-24 Batch ADMISSIONS OPEN!!!
Tuesday, May 9, 2023
ADMISSIONS OPEN for MPSC / UPSC 2024 Batch - Rajpath Academy, Pune
MPSC / UPSC 2024 Batch ADMISSIONS OPEN!!!



%20F1.jpg)
