Tuesday, February 28, 2023

MPSC चा नवीन पॅटर्न - ज्ञानाच्या कक्षा वाढल्या पाहिजेत...

 

 आजचे मरण उद्यावर....अशी म्हण मराठीत आहे. म्हणजे आज जी संकटाची
स्थिती आहे ती लांबणीवर नेणे...असा त्याचा अर्थ आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांनी MPSC चा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याबाबत
यश मिळविले. खरतर आयोगाच्या इतिहासात राजकारण, मिडिया यांचा इतका
सहभाग, चर्चा होत नसे. महाराष्ट्रात राज्यसेवेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याचीही
सहसा बातमी नसे... मात्र आता हे सर्व वाढले आहे...आणि सकस अभ्यास कमी
झाला आहे.
मुळातच MPSC मुख्य साठी केलेला वर्णनात्मक पॅटर्न ही समस्या किंवा
भीती असेल आणि व्यासंगपूर्ण, उच्च क्षमताधिष्ठित अभ्यास, लिखाणाचे कौशल्य,
सराव नसेल तर ...2025 देखील अपूर्ण पडेल.
...म्हणूनच ज्ञानाच्या कक्षा वाढल्या पाहिजेत...आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचा
नवीन पॅटर्नमध्येही विदयार्थ्यांना उपयोग होईल...भीती न बाळगता आत्मविश्वासाने
नवीन पॅटर्नला सामोरे जावे...

प्रा.मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी,पुणे.