Showing posts with label DY. Show all posts
Showing posts with label DY. Show all posts

Tuesday, June 6, 2023

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी
         
           दहावी, बारावी, अथवा पदवीला तुम्हाला किती गुण मिळाले... तुम्ही शाळेत , कॉलेजमधील स्कॉलर विद्यार्थी  होते काय?... हे मुद्दे  स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जास्त महत्वाचे नाहीत.  नाहीतर वर्गातील पहिल्या दहा क्रमांकाची सर्वच मुले IAS / IPS अथवा DC, तहसिलदार  झाली असती. मात्र वर्गातील साधारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळविताना दिसते. कारण त्याला डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्पर्धेत तग धरता येत नाही. आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचे तर स्पर्धा परीक्षेतून संधी भरपूर असतात हे विद्यार्थ्यांना वाढत्या वयानुसार समजून येते. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य , चिकाटी, खडतर मेहनत यामध्ये जो जिंकतो ... त्यास चांगली सरकारी नोकरी नक्कीच मिळते . कितीही चढउतार , संकटे आली तरी निराश न होता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला चिकटून राहणेच ... यशापर्यत पोहोचण्यास मदत करते... 'महापुरे झाडे (वृक्षे) जाती तेथे लव्हाळे राहाती '... 
प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com MPSC/UPSC Admissions Open!!! बॅच सुरु : 16 जून 2023
MPSC UPSC Foundation Course For 10th, 12th & College Students



Monday, May 22, 2023

MPSC/UPSC पंचायतराज- Local Self Government Important Points By Prof. Meeta Chaudhari


For latest updates Subscribe Us on Youtube 

'Motivational Speech' चा प्रभाव

MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ... 

'Motivational Speech' चा प्रभाव


     सोशल मीडियाच्या जमान्यात प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अगदी २५-३० वर्षांपूर्वी अधिकारी झालेले किंवा अलीकडे अधिकारी झालेल्या अनेकांचे motivational व्हिडीओ बघून अनेक विद्यार्थी व पालक दिवास्वप्न बघतात. आपणही त्यांच्यासारखेच IAS, IPS, Dy.Collector, तहसीलदार, PSI  व्हावे या प्रभावाने स्पर्धा परीक्षेकडे वळणारे लाखो विद्यार्थी आहेत.

     प्रेरणादायी व्याख्याते मिलियन व्ह्यूज मिळवितात ... पण त्यांच्याकडे असणारे गुण, क्षमता आपल्याकडे आहे का? त्यांना त्या -त्या वेळी उपलब्ध असलेली, पूरक परिस्थिती व संधी आता आहे काय? याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.

     आपले स्वतःचे ज्ञान, आवड, शिक्षण, कौटुंबिक स्थिती आणि स्पर्धा परीक्षेतील बदललेली गणित... आताचे वास्तव...  याचा विचार केला ... तर अनेक विद्यार्थी करिअरच्या योग्य वाटेवर जातील.

      बरं ... mativational speech देणारे जी गोष्ट सांगतात ... त्यात तथ्य किती? ...  मिथ्य किती ?...  की स्वतःचीच टिमकी वाजवणारे आहेत... याचाही विचार व्हावा .

    म्हणूनच विद्यार्थी, पालकांनी इतरांच्या यशाने प्रभावित होऊन स्पर्धा परीक्षेकडे वळण्यापेक्षा आपली क्षमता, महत्वाकांक्षा, मेहनत घेण्याची तयारी, दीर्घकाळासाठी कौटुंबिक पाठिंबा ... या सर्व बाबींचा विचार करावा.
            
धन्यवाद !
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०

Friday, May 19, 2023

* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ..

* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *

स्पर्धा परीक्षा  म्हणजे काय ...  केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी कोणकोणत्या परीक्षा आहेत ? UPSC , स्टाफ सिलेक्शन कमिशन, IBPS , RRB या भरती आयोग, बोर्ड याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती मिळवा.

MPSC  व राज्य शासनाच्या नोकऱ्यांसाठीच्या इतर भरती प्रकीया कोणत्या हे जाणून घ्या.
स्पर्धा परीक्षांमधून कोणकोणत्या, किती पदांसाठी संधी आहेत याची विश्वसनीय माहिती मिळवा व आपणास कोणते ध्येय साधायचे आहे ते निश्चित ठरवा. यासाठी  पुढील स्रोत आहेत.

१) राजपथ अकॅडमीचा प्लॅनर, संस्कार ही दोन पुस्तके.
२) Employment News , नोकरी संदर्भ , नोकरी न्यूज
३) ओळखीच्या माहितगार व्यक्तींकडून.
४) चांगल्या स्पर्धा परीक्षा क्लासेसकडून.
५) राजपथ अकॅडमीचे Youtube Channel
        
----
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०

Wednesday, May 17, 2023

Best Coaching Classes For MPSC Group A In Pune - Rajpath Academy

 MPSC Group A 2023-24 Batch ADMISSIONS OPEN!!!


विशेष मार्गदर्शन - प्रा. मीता चौधरी

कोर्सची वैशिष्ट्ये-
👉 स्पर्धापरीक्षा क्षेत्रातील २० पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव
👉 आयोगाच्याच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद
👉 Free Demo Sessions Available
Register Now!!! Call +91 8007909160