Wednesday, June 14, 2023

ऐकावे जनावे करावे मनाचे ... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

ऐकावे जनावे करावे मनाचे ...
दहावी, बारावीचे निकाल लागले... पुढे करिअरच्या वाटा निवडायच्या आहेत. अनेक ठिकाणी करिअर मेळावे आयोजित केले जातात. अनेक तज्ज्ञ् मार्गदर्शक विविध क्षेत्रांची माहिती देतात.
या दरम्यानच #UPSC चा किंवा #MPSC चा निकाल लागलेला असतो. यशस्वी उमेदवार ही करिअरचे मंत्र विद्यार्थ्यांना सांगतात. आपले परिचयातील, शेजारील, नातेवाईक यापैकी जे UPSC / MPSC ची तयारी करतात. त्यांना थोडा एक-दोन वर्षाचा अनुभव मिळाल्यास ते देखील मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरतात... आणि नव विद्यार्थी व पालकांना सल्ला देतात.
अनेकांचे अनेक सल्ले ... कोणाचे ऐकावे ? हाच मोठा प्रश्न ... मात्र आपणच स्वतःला सर्वात चांगले ओळखत असतो ... म्हणूनच #करिअर निवडताना स्पर्धा परीक्षेकडे येणार असाल तर अंतर्मनाचा आवाज ओळखा व स्वतःच्या मनाने अभ्यासपूर्ण निर्णय घ्या...
प्रा. मीता चौधरी

MPSC/UPSC Classes, mpsc group b, mpsc group c

No comments:

Post a Comment