Tuesday, June 6, 2023

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी
         
           दहावी, बारावी, अथवा पदवीला तुम्हाला किती गुण मिळाले... तुम्ही शाळेत , कॉलेजमधील स्कॉलर विद्यार्थी  होते काय?... हे मुद्दे  स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जास्त महत्वाचे नाहीत.  नाहीतर वर्गातील पहिल्या दहा क्रमांकाची सर्वच मुले IAS / IPS अथवा DC, तहसिलदार  झाली असती. मात्र वर्गातील साधारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळविताना दिसते. कारण त्याला डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्पर्धेत तग धरता येत नाही. आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचे तर स्पर्धा परीक्षेतून संधी भरपूर असतात हे विद्यार्थ्यांना वाढत्या वयानुसार समजून येते. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य , चिकाटी, खडतर मेहनत यामध्ये जो जिंकतो ... त्यास चांगली सरकारी नोकरी नक्कीच मिळते . कितीही चढउतार , संकटे आली तरी निराश न होता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला चिकटून राहणेच ... यशापर्यत पोहोचण्यास मदत करते... 'महापुरे झाडे (वृक्षे) जाती तेथे लव्हाळे राहाती '... 
प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com MPSC/UPSC Admissions Open!!! बॅच सुरु : 16 जून 2023
MPSC UPSC Foundation Course For 10th, 12th & College Students



No comments:

Post a Comment