Friday, June 9, 2023

योग्य मार्ग दाखविणारा .... तो गुरु ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

     स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्याचे ठरविले की क्लास कोणता लावायचा याची शोधाशोध सुरु होते. मात्र स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होऊन चांगला अधिकारी होण्यासाठी फक्त क्लास नाही तर 'गुरु ' मिळणे आवश्यक आहे. जो योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला यशाचा खडतर मार्ग चालण्यासाठी मदत करेन. तसेच तुम्ही प्रामाणिक, कार्यक्षम, संवेदनशील अधिकारी घडू शकाल यासाठी तुमच्यावर तसे संस्कार करेन.

      स्पर्धा परीक्षेच्या बाजारात व्यावसायिक दृष्टिकोन तर आहेच ... पण हा व्यवसाय फक्त खरेदी - विक्रीचा नाही. तर आपल्या सामाजिक समस्यांवर प्रशासकीय उपाययोजना करण्यासाठी कर्तबगार अधिकारी घडविण्याचा आहे. यासाठी या व्यवसायात मूल्य असणे गरजेची आहेत. ती मूल्ये जपणारा गुरु, मार्गदर्शक, वाटाड्या ... विद्यार्थांना भेटणे आवश्यक आहे.  म्हणून विद्यार्थी व पालकांनी MPSC / UPSC क्लासेस न शोधता मार्गदर्शक गुरूचा शोध घ्यावा.

प्रा. मीता  चौधरी
www.rajpathacademy.com

No comments:

Post a Comment