Monday, May 22, 2023

'Motivational Speech' चा प्रभाव

MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ... 

'Motivational Speech' चा प्रभाव


     सोशल मीडियाच्या जमान्यात प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अगदी २५-३० वर्षांपूर्वी अधिकारी झालेले किंवा अलीकडे अधिकारी झालेल्या अनेकांचे motivational व्हिडीओ बघून अनेक विद्यार्थी व पालक दिवास्वप्न बघतात. आपणही त्यांच्यासारखेच IAS, IPS, Dy.Collector, तहसीलदार, PSI  व्हावे या प्रभावाने स्पर्धा परीक्षेकडे वळणारे लाखो विद्यार्थी आहेत.

     प्रेरणादायी व्याख्याते मिलियन व्ह्यूज मिळवितात ... पण त्यांच्याकडे असणारे गुण, क्षमता आपल्याकडे आहे का? त्यांना त्या -त्या वेळी उपलब्ध असलेली, पूरक परिस्थिती व संधी आता आहे काय? याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.

     आपले स्वतःचे ज्ञान, आवड, शिक्षण, कौटुंबिक स्थिती आणि स्पर्धा परीक्षेतील बदललेली गणित... आताचे वास्तव...  याचा विचार केला ... तर अनेक विद्यार्थी करिअरच्या योग्य वाटेवर जातील.

      बरं ... mativational speech देणारे जी गोष्ट सांगतात ... त्यात तथ्य किती? ...  मिथ्य किती ?...  की स्वतःचीच टिमकी वाजवणारे आहेत... याचाही विचार व्हावा .

    म्हणूनच विद्यार्थी, पालकांनी इतरांच्या यशाने प्रभावित होऊन स्पर्धा परीक्षेकडे वळण्यापेक्षा आपली क्षमता, महत्वाकांक्षा, मेहनत घेण्याची तयारी, दीर्घकाळासाठी कौटुंबिक पाठिंबा ... या सर्व बाबींचा विचार करावा.
            
धन्यवाद !
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०

No comments:

Post a Comment