Showing posts with label mpsc books. Show all posts
Showing posts with label mpsc books. Show all posts

Thursday, May 25, 2023

'स्वतःला ओळखा'... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

'स्वतःला ओळखा'... 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व त्यातील यश ... यासाठी संयम, चिकाटी, सातत्य याची गरज असते. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. व्यक्तिमत्त्व विकसित होणे  ही  बाब देखील आवश्यक आहे. पदवीपर्यंत केलेल्या अभ्यासापेक्षा कैक पटीने जास्त अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वाचन, लिखाणाची बैठक जमविणे, MPSC/UPSC संदर्भ साहित्य मिळवणे, अनेक वैयक्तिक बाबींना काही काळ तिलांजली देणे, तसेच कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रापासून अलिप्त ... एकांतात राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या काळात आर्थिक गोष्टींची जुळवाजुळव ही तर अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे... या सर्वांमधून मन स्थिर ठेवून तयारी करताना अपयशाचा सामना जास्त व आशेची झुळूक तशी अल्प ... अशी स्थिती असते.

म्हणूनच ही सर्व परिस्थिती पेलण्याची क्षमता, इच्छा, जिद्द आपल्यामध्ये आहे का?...  आपला निर्धार पक्का आहे का? स्पर्धा परीक्षेतील चढ उताराशी  चिवट झुंज तुम्ही देऊ शकता काय? हे जाणा ... स्वतःला ओळखा ... मग स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानसागरात स्वतःला झोकून द्या ... फक्त जिकंण्यासाठीच. .. !


धन्यवाद !

प्रा. मीता चौधरी

संस्थापक व प्रमुख

राजपथ अकॅडमी, पुणे

८००७९०९१६०

Friday, May 19, 2023

* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ..

* स्पर्धा परीक्षेतील संधीबाबत योग्य माहिती मिळवा *

स्पर्धा परीक्षा  म्हणजे काय ...  केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी कोणकोणत्या परीक्षा आहेत ? UPSC , स्टाफ सिलेक्शन कमिशन, IBPS , RRB या भरती आयोग, बोर्ड याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती मिळवा.

MPSC  व राज्य शासनाच्या नोकऱ्यांसाठीच्या इतर भरती प्रकीया कोणत्या हे जाणून घ्या.
स्पर्धा परीक्षांमधून कोणकोणत्या, किती पदांसाठी संधी आहेत याची विश्वसनीय माहिती मिळवा व आपणास कोणते ध्येय साधायचे आहे ते निश्चित ठरवा. यासाठी  पुढील स्रोत आहेत.

१) राजपथ अकॅडमीचा प्लॅनर, संस्कार ही दोन पुस्तके.
२) Employment News , नोकरी संदर्भ , नोकरी न्यूज
३) ओळखीच्या माहितगार व्यक्तींकडून.
४) चांगल्या स्पर्धा परीक्षा क्लासेसकडून.
५) राजपथ अकॅडमीचे Youtube Channel
        
----
प्रा. मीता चौधरी
संस्थापक व प्रमुख
राजपथ अकॅडमी, पुणे
८००७९०९१६०

* नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन.... 'यशाचा राजपथ'

 MPSC /UPSC तील 'नवविद्यार्थ्यांसाठी '

* नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन.... 'यशाचा राजपथ'

         करियरबाबत जागृत झालेले अनेक विद्यार्थी शालेय व कॉलेज जीवनातच आपण पुढे  काय करायचे  हे ठरवितात. आपण IAS , IPS व्हायचे ... असे  काहींचे स्वप्न असते तर काहींना तहसिलदार, मंत्रालयीन अधिकारी व्हावेसे  वाटते ... काही विद्यार्थाना  फौजदारपदाच्या ऍक्शन पोस्टमध्ये इंटरेस्ट असतो किंवा कोणतीही सरकारी अधिकारपदाची नोकरी करून स्थैर्य मिळविण्याचे ध्येय असते.

         पदवीच्या उंबरठ्यावर असलेले लाखो विद्यार्थी स्वतः स्वप्न बाळगून ... आपल्या पालकांना स्वप्न दाखवून दरवर्षी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दाखल होतात. पुणे ही  तर अशा स्वप्नांळू स्पर्धा परीक्षार्थीची पंढरी होय. या नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन करणारे सदर नियमित वाचा... 'यशाचा राजपथ' 

Monday, April 24, 2023

भूगोल व कृषी प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) eBook

 

भूगोल व कृषी प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह), ebook, mpsc upsc ebooks
भूगोल व कृषी प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) eBook आता Google Play Store वर उपलब्ध.

ebook वर ८०% सवलत !

आजच राजपथ अकॅडमी चे मोबाइल ऍप डाउनलोड करा.

Download Mobile Application

Friday, April 21, 2023

आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) ebook

 

आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह), MPSC ebook,  ebook on rajpath academy mobile app

आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) eBook आता Google Play Store वर उपलब्ध.

ebook वर ८०% सवलत !

आजच राजपथ अकॅडमी चे मोबाइल ऍप डाउनलोड करा.

Download Mobile Application

Monday, April 10, 2023

 स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?

जीवन ही एक शाळाच आहे... मग तेथे परीक्षा असणारच ... शैक्षणिक वाटचालीत तर परीक्षांचे महत्व सर्वात जास्त... या चौकटीतील परीक्षांपेक्षा स्पर्धा या वेगळ्या आहेत. येथे स्वतःला सिद्ध करावे लागते? सर्वापेक्षा अव्वल ठरावे लागते... मेरीट गाठावे लागते... एका शिखराजवळ पोहोचल्यावरही कडेलोट होऊन पुन्हा पायथ्याशी लोळण घ्यावी लागते... लहान मूल सारखे पडते, धडपडते ... पण तरीही पुनःपुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करते... तशी धडपड स्पर्धा परीक्षेत (MPSC/UPSC) करीत रहावी लागते... आणि एक दिवस ही दुडदूड ... दौड होते आणि आपले इसिप्त साध्य होते.

प्रा.मीता चौधरी 
संस्थापक व प्रमुख,


Monday, March 27, 2023

MPSC/UPSC Geography (भूगोल) Tips - प्रा. एच.के.डोईफोडे , विषय तज्ज्ञ, राजपथ अकॅडमी, पुणे


MPSC/UPSC Geography (भूगोल)चा अभ्यास कसा करावा, भूगोल विषयाचा सर्व परीक्षांमध्ये असणारा अभ्यासक्रम त्याचे अभ्यास साहित्य व महत्वाच्या टिप्स - प्रा. एच.के.डोईफोडे , विषय तज्ज्ञ, राजपथ अकॅडमी, पुणे

For more videos Subscribe Us on YOUTUBE

राजपथ अकॅडमी चे अँप Google Play Store वर उपलब्ध.

राजपथ अकॅडमीचे UPSC/MPSC/PSI/STI/ASO व इतर सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त पुस्तके E-Book स्वरूपात उपलब्ध. आजच राजपथ अकॅडमी चे अँप Google Play Store वरून डाउनलोड करा.