Thursday, June 1, 2023

ईर्षा नको तर महत्वाकांक्षा पाहिजे... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

ईर्षा नको तर महत्वाकांक्षा पाहिजे...

             स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे यासाठी स्वतःचे अंतर्बाह्य व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघाले पाहिजे. आपल्या परिचयातील किंवा भवतालचे कोणीही अधिकारी झाले तर काहीजण मनात ईर्षा बाळगतात आणि आपण किंवा आपली मुल देखील अधिकारी झाली पाहिजेत किंवा मी करून दाखवितो अशी ईर्षा बाळगणे म्हणजे आत्मघात होय. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळे असते आणि 'घटा  घटाचे रूप आगळे , प्रत्येकाचे दैव वेगळे... 'हेच खरे असते.

             त्यामुळे मी अमुकासारखे अधिकारी होऊन दाखवितो ही स्पर्धा करण्यापेक्षा मला आयुष्यात अमूक एक करायचे आहे ही महत्वाकांक्षा बाळगा... त्यासाठी प्रामाणिक कष्ट करा... स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व अनुभव हा आयुष्याला समृद्ध करीत असतो ... विविध क्षेत्रातील ज्ञानाने आपण संपन्न होत असतो... आणि ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही... ते कुठेतरी उपयोगीच पडते. आम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षेची वाटचाल करून चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करू असा निर्धार करा... इतरांशी बरोबरी , स्पर्धा करण्याचा विचार करू नका.

प्रा. मीता चौधरी
www.rajpathacademy.com

Tuesday, May 30, 2023

UPSC ची तयारी मराठी माध्यमातून करू शकतो का?


UPSC ची परीक्षा मराठीसह इतर भारतीय भाषांमधून देता येते. मराठी माध्यमात शिकलेल्या व ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती न बाळगता UPSC ची मराठीतून तयारी करू शकतात याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे.

For latest updates Subscribe Us on Youtube 

Monday, May 29, 2023

श्रुतीशा पटाडे याची IAS पदावर निवड झाल्याबद्दल राजपथ अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन

श्रुतीशा पटाडे याची IAS पदावर निवड झाल्याबद्दल राजपथ अकॅडमी कडून हार्दिक अभिनंदन!


अंधानुकरण करू नये...MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन...

MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

अंधानुकरण करू नये...
एक यशस्वी झालेल्याचे कौतुक होते... त्याचेच सर्व ते योग्य ... ती यशस्वी व्यक्ती बोलेन ते प्रमाण, सांगेन ती पूर्व दिशा... असेच आपल्याकडे घडते आणि म्हणून मलाही अधिकारी व्हायचे तर अशाच यशस्वीतांचे सर्व बाबतीत अनुकरण करणे हे अंधानुकरण होय.
या यशस्वी व्यक्तीने लावलेला क्लास, अभ्यासलेली पुस्तके तीच तेवढी योग्य... असेही नसते. कारण एक यशस्वी होतो म्हणजे निकालात त्याच्या सुदैवाने सर्व गोष्टी जुळून आलेल्या असतात.
पण एक यशस्वी होताना बाकीचे ९९% अयशस्वी झालेल्यांची योग्यता तसूभरही कमी नसते. mpsc/upsc च्या संघर्षात शेवटच्या टप्प्यापर्यत पोहोचलेले सर्वच गुणवान व प्रज्ञावंत असतात... कदाचित काकणभर सरस असतात. फक्त त्यांचे सर्व सूर त्यावेळेस जुळून न आल्याने फक्त त्यांना पोस्ट भेटली नाही; इतकेच आपण म्हणू शकतो. मात्र यांच्याकडूनही कित्येक गोष्टी शिकण्यासारख्या असतात.

UPSC /MPSC च्या निकालानंतर होणाऱ्या वारेमाप मुलाखती, सल्ले, मार्गदर्शन या सर्व गोष्टींना भारावून जाऊन अंधानुकरण करण्यापेक्षा डोळस अनुकरण करावे हेच योग्य.
प्रा.मीता चौधरी

MPSC -UPSC Foundation Course

 

MPSC UPSC Foundation Course | Admissions Open | Preparation to become an officer from 10th & 12th...

MPSC-UPSC Foundation Course, rajpath academy,  mpsc foundation courses in pune, mpsc upsc foundation course for 10th & 12th students


Thursday, May 25, 2023

'स्वतःला ओळखा'... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

 MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...

'स्वतःला ओळखा'... 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व त्यातील यश ... यासाठी संयम, चिकाटी, सातत्य याची गरज असते. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी सर्वच विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. व्यक्तिमत्त्व विकसित होणे  ही  बाब देखील आवश्यक आहे. पदवीपर्यंत केलेल्या अभ्यासापेक्षा कैक पटीने जास्त अभ्यास करावा लागतो. त्यासाठी वाचन, लिखाणाची बैठक जमविणे, MPSC/UPSC संदर्भ साहित्य मिळवणे, अनेक वैयक्तिक बाबींना काही काळ तिलांजली देणे, तसेच कौटुंबिक, सामाजिक क्षेत्रापासून अलिप्त ... एकांतात राहून अभ्यास करणे आवश्यक असते. या काळात आर्थिक गोष्टींची जुळवाजुळव ही तर अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे... या सर्वांमधून मन स्थिर ठेवून तयारी करताना अपयशाचा सामना जास्त व आशेची झुळूक तशी अल्प ... अशी स्थिती असते.

म्हणूनच ही सर्व परिस्थिती पेलण्याची क्षमता, इच्छा, जिद्द आपल्यामध्ये आहे का?...  आपला निर्धार पक्का आहे का? स्पर्धा परीक्षेतील चढ उताराशी  चिवट झुंज तुम्ही देऊ शकता काय? हे जाणा ... स्वतःला ओळखा ... मग स्पर्धा परीक्षेच्या ज्ञानसागरात स्वतःला झोकून द्या ... फक्त जिकंण्यासाठीच. .. !


धन्यवाद !

प्रा. मीता चौधरी

संस्थापक व प्रमुख

राजपथ अकॅडमी, पुणे

८००७९०९१६०