Monday, December 17, 2018

राज्यसेवा पूर्व परीक्षेतून उज्ज्वल यशाची संधी...


राज्यसेवा परीक्षा म्हणजे तीन प्रवेशाचे महानाट्यच आहे. याची सुरुवात म्हणजे नांदी आता झाली आहे. 17 फेब्रुवारी 2019 च्या राज्यसेवा परीक्षेच्या तयारीस नव्या उत्साहाने अनेकांनी प्रारंभ केला आहे. जास्त जागा जाहीरातीत असल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे. चांगला अभ्यास  करणार्या अनुभवींसाठी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या लाटेत यावर्षी नव्यानेच सामील झालेल्यांनाही अभ्यासाच्या योग्य नियोजनाने चांगली संधी साधता येईल.

l  राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नियोजन : राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 400 गुणांची आहे. 3:1 अशी नकारात्मक गुणपध्दती या परीक्षेसाठी आहे. या परीक्षेसाठी दोन पेपर असतात. ते म्हणजे सामान्य अध्ययन व सीसॅट हे होय. सामान्य अध्ययन हा 100 प्रश्नांचा व 200 गुणांचा पेपर आहे. सीसॅट हा 80 प्रश्नांचा व 200 गुणांचा पेपर आहे. या दोन्ही पेपरसाठी समान महत्त्व देऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थी सीसॅट ची भीती मनात बाळगून त्यावरच लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे सामान्य अध्ययनकडे दुर्लक्ष होते. UPSC पूर्व परीक्षेसाठी सीसॅट qualifying ठेवले आहे व सामान्य अध्ययन पेपरमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. MPSC तसा निर्णय घेतला नाही. त्यामुळे मेरिट लिस्ट साठी दोन्ही पेपरला समान न्याय दिला पाहिजे. दोन्हींचा समतोल साधताना विदयार्थ्यांची त्रेधा उडते. ‘एक धरलं तर दुसरे पळतंयअशी अवस्था जीएस-सीसॅट(GS-CSAT) बाबत होते.  म्हणून आपल्या वेळापत्रकात रोज सामान्य अध्ययनसाठी सखोल वाचन करणे आणि सीसॅटसाठी जास्तीत जास्त सराव करणे, असा समतोल साधावा.

l   पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना :
current affairs 2018,Chalu Ghadamodi 2018 Marathi Book FOR MPSC STATE SERVICE
1) सामान्य अध्ययन(GS) - पूर्व परीक्षेसाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी हे विषय सामान्य अध्ययन पेपरमध्ये प्रश्न विचारताना विचारात घेतले जातात. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांचा पाया विस्तृत आहे. त्यामुळे बेसिक पुस्तके अभ्यासण्यापासून दर्जेदार, सखोल संदर्भ ग्रंथ अभ्यासणे, नोट्स काढणे आवश्यक आहे. या चार विषयांसोबत सर्वाधिक भर चालू घडामोडींवर दयावा. करंट ओरिएंटेड प्रश्न सामान्य अध्ययन मध्ये विचारण्याचा कल वाढला आहे. UPSC पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययनच्या पेपरमध्ये याचा प्रत्यय नेहमीच येतो. MPSC याच मार्गाने जात आहे असे दिसते. म्हणूनच सुरुवातीला आर्थिक पाहण्या, इयर बुक, यांचे विश्लेषण करावे. लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र यासारखी मासिके वाचावीत. मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांचे वाचन करावे. त्यामधून रोज नोट्स लिहिणे यासारख्या सवयी अंगी बाणवणे अत्यावश्यकच आहे.
 2) सीसॅट(CSAT) सीसॅट म्हणजे Civil Services Aptitude Test म्हणजे नागरी सेवा कल चाचणी होय. हा पेपर अभ्यासताना त्याचे तीन भाग करावे.                    1) आकलन2) रीजनिंग, 3) निर्णयक्षमता.
80 प्रश्नांपैकी जवळपास 45 ते 47 प्रश्न आकलनावर विचारले जातात. म्हणजे मराठी व इंग्रजी उतार्याचे प्रश्नोत्तराचे हे प्रश्न असतात. यासाठी वेगाने वाचणे, वेगाने समजणे गरजेचे आहे तर वेगाने प्रश्न सोडविता येतात.  वृत्तपत्रांसह इतर वाचन करताना ही आकलनक्षमता वाढीस लागते. म्हणून त्यासाठी सराव करण्यासारखा दुसरा उपाय नाही. 25-26 प्रश्न हे रिजनिंगचे(Reasoning) आहेत. अंकगणित, बुध्दीमत्ता चाचणी यामधील अनेकविध कठीण प्रकार, माहितीचे विश्लेषण आदींवर विचारलेल्या या प्रश्नांना सोडविण्यासाठी शॉर्टकर्ट, फार्म्युले माहिती असावे. दर्जेदार सरावसंचातून सराव करीत राहावे. निर्णयक्षमताचे सरासरी पाच ते सहा प्रश्न असतात. ज्यामध्ये गुण वजा होत नाही. तर प्रत्येक पर्यायानुसार थोडे फार तरी गुण मिळतातच. मात्र अडीचपैकी अडीच गुण मिळविण्याइतके निर्णयक्षमतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विदयार्थ्यांची Maturity Awareness चांगला असावा. अनेक वर्षाच्या अभ्यासाने, उत्तम सर्वांगीण वाचनाने, अनुभवाने व व्यावहारिक ज्ञानाने हे वरील गुण अंगात आणि विचारात भिनलेले असतात. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा, विचारसरणीचा ते भाग असतात. असेच गुण विदयार्थ्यांचा नागरी सेवेबाबतचा कल स्पष्ट करतो आणि आपल्याला चांगले गुण मिळवून देतो.
      पुढच्या लेखापासून सामान्य अध्ययन(GS) व CSATच्या अभ्यासाची सर्वांगीण चर्चा करुया. तोपर्यंत तुमचा अभ्यास अखंडपणे सुरु ठेवावा. सर्वांना शुभेच्छा!

क्रमश:                                                                                                   
                                                प्रा.मीता चौधरी
संस्थापक व संचालिका
राजपथ अकॅडमी, पुणे.
फोन. नं- ८००७९०९१६०.                                         

2 comments:

  1. आपल्या लेखामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे नियोजन व तयारी करणे सोपे झाले, तसेच आपल्या मौल्यवान लेखामुळे GS & CSAT अभ्यासात समतोल कसा राखावा याचे उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी धन्यवाद

    ReplyDelete
  2. आपल्या MPSC prelim exam strategy अमूल्य लेखाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete