Friday, December 7, 2018

२.० च्या निमित्ताने ...


robot 2.0 rajinikants movie

२.० चित्रपटात टेक्नॉलॉजी मानवाला वाचवू शकते हे जसे दाखवले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या रक्षणाची अपरिहार्यताही अधोरेखित केली आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या हे मानले तरी चित्रपटातील पक्षीराजाच्या दृष्टीने बघितले तर सेलफोनचा अफाट वापर प्रगतीसाठी आवश्यक आहे का? सेलफोन ची आवश्यकता आहेच पण त्याच्या आहारी जाऊन अक्षरश: मोबाईलचे व्यसनच जडल्यासारखी स्थिती सभोवती दिसते. सेलफोनचा मर्यादित वापरातून ‘पर्यावरणरक्षण’ व ‘समाज स्वास्थ्य’ या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. पुण्यात व्यसनमुक्ती केंद्रासारखेच मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरु झाले आहे. या केंद्राची व मोबाईल अॅडिक्ट असणार्यांची संख्या रोखण्याची जबाबदारी प्रत्येकावरच आहे.

प्रा. मीता चौधरी,
संस्थापक व प्रमुख, 


No comments:

Post a Comment